अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई
 
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. गुजरातवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टँकरचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर पुलावरून खाली कोसळला असून या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.