जखमी झालेल्या चाहत्यांची रणवीरने मागितली माफी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये स्टेजवर रॅप साँग गात असताना अभिनेता रणवीर सिंगने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक स्टेजवरून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारली. याबाबतची कोणतीही कल्पना नसल्याने चाहतेसुद्धा घाबरले. गर्दीत अचानक उडी मारल्याने काही चाहतेसुद्धा जखमी झाल्याचे समजतंय.
 
 
 
 
 
 
या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘गली बॉय’ या त्याच्या आगामी चित्रपटातील रॅप साँग गात असताना रणवीर अचानक त्याचा गॉगल आणि हॅट काढून स्टेजवरून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारताना या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत काही महिलासुद्धा जखमी झाल्याचे कळतंय.
 
 
 
 
 
 
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्याच्या अशा वागण्यावर टीका केली. या घटनेनंतर रणवीर सिंगने ट्विटर द्वारे आपल्या चाहत्यांची माफी मागितली.