सरकारी पैशाची लूट करून रॉबर्ट वढेरांनी घेतली विदेशात संपत्तीसंबित पात्रा यांचा घणाघाती आरोप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
नवी दिल्ली,
संरक्षण साहित्य तसेच पेट्रोलियम खरेदी व्यवहारातून रॉबर्ट वढेरा यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी पैशाची लूट केली असून, या पैशातूनच त्यांनी परदेशात मोठ्या प्रमाणात संपत्ती विकत घेतली असल्याचा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी आज बुधवारी केला.
 
 
 
 
 
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत डॉ. पात्रा म्हणाले की, ज्या माणसाजवळ आपला व्यवसाय सुरू करायला एक लाख रुपयांचे भांडवलही नव्हते, असा रोडपती माणूस काही दिवसातच करोडपती कसा झाला, सरकारी पैशाची लूट करून वढेरा यांनी परदेशात बेकायदेशीर संपत्ती खरेदी केली, एवढेच नाही तर दुबई, िंसगापूर अणि स्वित्झर्लंडसारख्या देशातून राऊंट ट्रििंपगच्या माध्यमातून हा पैसा पांढरा करून घेतला.
 
 
 
आतापर्यंत कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जामिनावर फिरत होते, आता त्या मालिकेत रॉबर्ट वढेराही आलेले दिसतील. भ्रष्टाचार हा कॉंग्रेसचा एककलमी कार्यक्रम आहे. अगस्ता वेस्टलॅण्ड, सिमेन्टेक तसेच 2009 च्या पेट्रोलियम सौद्यांशी रॉबर्ट वढेरा यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय भंडारी, मनोज अरोरा आणि सुमित चढ्‌ढा कोण आहेत, याचे उत्तर राहुल गांधी यांनी अद्याप दिलेले नाही.
 
 
 
रॉबर्ट वढेरा यांच्यावर आरोप करण्याआधी भाजपाने आपल्या प्रामाणिकपणाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, या राजद नेते तेजस्वी यादव यांच्या आवाहनाकडे लक्ष वेधले असता पात्रा म्हणाले की, जे स्वत: जामिनावर फिरत आहेत, त्यांनी आधी आपले वडील तुरुंगात का आहेत, तसेच त्यानंतरही ते राजकारणात सक्रिय का आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, मग दुसर्‍यांबद्दल बोलावे.
 
 
 
प्रियांका वढेरा यांच्या राजकारण प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर राहुल गाधी तसेच प्रियांका वढेरा आणि रॉबर्ट वढेरा यांचे होर्डिंग्ज लागले होते, याचा संदर्भ देत पात्रा म्हणाले की, कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर दोन गुन्हेगारांचे होर्डिंग्ज लागले आहेत. यातील राहुल गांधी 5 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जामिनावर बाहेर आहेत, तर दुसरा म्हणजे रॉबर्ट वढेरा, त्यांची मनी लॉंिंड्रगच्या आरोपात अंमलबजावणी संचालनालयात हजेरी लागली आहे.