शेअर बाजार वधारला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
मुंबई,
 
 
 
भारतीय गुंतवणूकदारांच्या उत्साहाने आज बुधवारी भारतीय शेअर बाजार चांगलाच वधारला. आज प्रामुख्याने सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली. परिणामी मुंबई शेअर बाजार निर्देशांक 358.42 अंकांनी वाढून 36,975.23 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 128.10 अंकांनी वधारून 11,062.45 वर स्थिरावला. आज प्रामुख्याने हेवीवेट रिलायन्स आणि टीसीएस आणि एचडीएफसी कंपन्यांसहित धातू, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी दिसून आली.
 
 
 

 
 
 
प्रमुख 30 कंपन्यांचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँकेचा अपवाद वगळता इतर सर्वच कंपन्यांनी सकारात्मक व्यवहार केले. तर, बजाज फायनान्स, टाटा स्टील, ओएनजीसी, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.
 
 
 
टेक मिंहद्राचा शेअर उच्चांकावर
तिसर्‍या तिमाहीत झालेल्या दमदार कामगिरीनंतर माहिती तंत्रज्ञान कंपनी टेक मिंहद्राचा शेअर आज ‘ऑल टाईम हाय’वर व्यवहार करत आहे. आज 784 वर व्यवहाराला सुरुवात केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांची तेजी येऊन 813.90 चा उच्चांक गाठला आहे. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.