काराचीतून मिळाले शबाना आझमी आणि जावेद अख्तरांना निमंत्रण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी आणि त्यांचे पती, पटकथा लेखक जावेद अख्तर यांना पाकिस्तानमधील कराची येथील आर्ट्स काऊन्सिल च्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शबाना आझमी यांचे वडील सुप्रसिद्ध कवी कैफी आझमी यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. ‘आम्ही कैफी आझमी यांची मुलगी शबाना आझमी आणि त्यांचे पती जावेद अख्तर यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्यासहित भारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आले आहे’, अशा माहिती आर्ट्स काऊन्सिलच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. 
 
 
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी कार्यक्रमासाठी पाकिस्तानात येण्याची तयारी दर्शवली आहे. हा कार्यक्रम २३ आणि २४ जानेवारीला पार पडणार आहे. यावेळी शबाना आझमी आणि जावेद अख्तर उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
 
 
‘ही खूप मोठी संधी आहे. भारतातील प्रसिद्ध लेखक, कवी आणि कलाकार येऊन पाकिस्तानमधील लोकांशी संवाद साधणार असून हा कार्यक्रम यशस्वी होणार याची आम्हाला खात्री आहे’, असे  काऊन्सिलचे सचिव प्रोफेसर एजाज फारुखी यांनी सांगितले.