अभिनेत्री शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बिग बॉसच्या दहाव्या पर्वाची विजेती आणि भाभीजी घर पे है फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकारणात पाऊल ठेवले आहे. शिल्पा शिंदेने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुटुंबाबाबत नकारात्मक कमेंट येत असल्याने ट्विटरला रामराम केल्याने शिल्पा शिंदे नुकतीच चर्चेत होती. 
बिग बॉस जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे सुनील ग्रोव्हरच्या क्रिकेटवर आधारित वेब सीरिज ‘जिओ धन धना धन’ मध्ये झळकली होती. सुनीलची पत्नी गुगली देवीची भूमिका तिने निभावली होती. एका मराठी कार्यक्रमात लावणी डान्स करतानाही ती दिसणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
शिल्पा शिंदेचा जन्म 28 ऑगस्ट 1977 रोजी झाला आहे. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरात तिचा जन्म झाला. तिचे वडील डॉ सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. शिल्पाच्या वडिलांना तिने कायद्याचे शिक्षण घ्यावे अशी इच्छा होती. पण शिल्पा शिंदेला अभिनेत्री व्हायचे होते .