स्पाईस जेट चे मेगा सेल ; ऑफर ९ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
स्पाइस जेटने मंगळवारी काही निवडक मार्गांसाठी मेगा सेलची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये अवघ्या 899 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी आहे. याशिवाय कंपनीच्या विविध अटी पाळून तुम्ही अतिरिक्त 25 टक्के सवलत देखील मिळवू शकता. 
या सेलमध्ये देशांतर्गत प्रवासासाठी 899 रुपये इतकी तिकीटाची सुरूवातीची किंमत ठेवण्यात आली असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3 हजार 699 रुपयांपासून तिकीट बुक करता येईल. ही ऑफर 9 फेब्रुवारी, 2019 पर्यंत उपलब्ध असून सेलमध्ये बुक केलेल्या तिकीटांवर 25 सप्टेंबर 2019 पर्यंत प्रवास करता येईल. पहिले बुकिंग करणाऱ्याला प्रथम प्राधान्य असेल. याशिवाय तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डद्वारे तिकीटांवर 10 टक्के अतिरिक्त सूट मिळवू शकतात. यासाठी SBISALE या प्रोमो कोडचा वापर करावा, आणि जर स्पाइस जेटच्या मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक केले तर 5 टक्के जादा सूट मिळू शकते. ही सवलत मिळवण्यासाठी ADDON30 प्रोमो कोडचा वापर करावा.