तेलुगू टीव्ही अभिनेत्री नागा झांसी हिने हैद्राबादमधील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. २१ वर्षीय नागा झांसी टीव्हीवरील ‘पवित्र बंधन’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीस आली होती. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.
नागा झांसी वारंवार बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने भाऊ दुर्गा प्रसाद याने पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिल्यानंतर नागा झांसीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री घऱात एकटी राहत होती. मृत्यूआधी ती एका व्यक्तीशी चॅट करत होती. गेल्या सहा महिन्यांपासून ती या व्यक्तीच्या संपर्कात होती. पोलिसांनी मोबाइल जप्त केला असून कॉल डाटा आणि चॅट रेकॉर्ड चा तपस चालू आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी नागा झांसीचे त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा दावा केला आहे. पण कुटुंबीयांना नात्यास नकार दिल्याने गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.