माणसाच्या प्रतिहल्ल्यात सिंहाचे मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोलोरॅडो
 
 
 
 
फोर्ट कॉलिन्स भागातील हॉर्सटूथ भागात एका माणसाच्या प्रतिहल्ल्यात पर्वतीय सिंहाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोलोरॅडोच्या उत्तरेकडील भागात एक व्यक्ती धावत असताना पर्वतीय सिंहाने हल्ला केला. त्या व्यक्तीने  सिंहावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्याने स्वतःच्या रक्षणासाठी  सिंहाच्या मानेला हात घातला आणि ती अतिशय जोरात आवळली. त्यामुळे सिंहाचा श्वास कोंडून मृत्यू झाला.
 
 
 
 
हॉर्सटूथ भागात एक व्यक्ती धावत असताना त्यावेळी आपल्या मागे कोणीतरी असल्याचा संशय त्याला आला.  तो मागे वळला असता, त्याच्यावर पर्वतीय सिंहाने  हल्ला केला, अशी माहिती कोलोरॅडो पार्क्स अँड वाईल्डलाईफच्या अधिकाऱ्यांनी दिली. माणसाच्या हालचालींमुळे तरुण सिंहाने  हल्ला केला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे . पर्वतीय सिंहाने व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि मनगटावर हल्ला केला. त्यातून त्याने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. सिंहाच्या हल्ल्यात संबंधित व्यक्तीला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप तरी या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृत्यूमूखी पडलेल्या पर्वतीय सिंहाचे वय एक वर्षाहून कमी होते.