रेड कार्पेटची शान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
वर्षाच्या सुरुवातीला अनेक ‘अवॉर्ड-शो’ पाहायला मिळत असून ऑस्कर पुरस्काराचे वाट संपूर्ण जगाला असते. ‘अवॉर्ड-शो’मध्ये अनेक कलाकार स्टाईलिश आऊटफिट परिधान करीत असून त्यामधील काही त्याच्या हटके लूकमुळे प्रसिद्ध होतात. ऐश्वर्या रायने ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात परिधान केलेले गाऊन त्याच्या स्टाईलिश आणि हटके लूकमुळे प्रसिद्ध झाले होते. तसेच विद्या बालन आणि सोनम कपूरने परिधान केलेले पारंपरिक वेशभूषेचे चर्चा सुद्धा सर्वत्र झाले. भारतीय कलाकारांव्यतिरिक्त हॉलिवूडमधील कलाकारांचे रेड कार्पेटवरील लूक सुद्धा प्रसिद्ध झाले. ऑस्कर्स पुरस्काराच्या रेड कार्पेटवर संपूर्ण जगाचे लक्ष असते. अनेक कलाकार महागडे आऊटफिट रेड कार्पेटसाठी निवडतात. कलाकारांनी परिधान केलेले रेड कार्पेटवरील अशाच काही महागड्या आऊटफिटबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.

 
 
जेन फोंडा 
1972 मध्ये झालेल्या ऑस्कर्स पुरस्काराच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री जेन फोंडाने काळ्या रंगाचे ट्युनिक आणि पॅन्टसूट परिधान केले होते. हे आऊटफिट त्याच्या हटके लूकमुळे प्रसिद्ध झाले असून हे या वर जेन फोंडाने शॅग हेयरकट केले होते. फॉर्मल लूक देणारे ट्युनिक सेंट लॉरेंट काऊचर आणि पॅन्टसूट रॉजर वदीम ‘पॅरिस डे’चे होते. हे आऊटफिट आता सुद्धा ट्रेिंडगमध्ये असून यामध्ये भडक रंग जसे गुलाबी आणि निळा उपलब्ध आहे. तसेच ट्युनिक आणि पॅन्टसूटवर हाय बन आणि स्ट्रेट हेयरस्टाईल शोभून दिसते. जेन फोंडाला 1972 मध्ये ‘क्लूट’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचे ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.
 
जेनिफर लॉरेंस
‘हंगर गेम,’ ‘पॅसेंजर’ आणि ‘िंवटर्स बोन’ सारख्या चित्रपटात जेनिफर लॉरेंसने अभिनय केले असून आपल्या उत्तम अभिनयामुळे तिचे चाहते जगभरात आहे. ऑस्कर्समध्ये परिधान केलेले ब्लश िंपक बॉलगाऊनची चर्चा सर्वत्र झाले होते. जेनिफर लॉरेंसने परिधान केलेल्या गाऊनची िंकमत 28 कोटी असून ‘सिल्वर लाईिंनग प्लेबुक’साठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हे ब्लश िंपक गाऊन रेड कार्पेटवर परिधान केलेले सर्वात महागड्या आऊटफिट पैकी एक आहे.
निकोल किडमन
 ऑस्कर पुरस्काराच्या रेड कार्पेटवर कोण काय परिधान करणार, याकडे ‘फॅशन जगत’चे नेहमीच लक्ष लागून असते. निकोल किडमन तिच्या हटके आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखले जात असून ऑस्करच्या रेड कार्पेटवर तिने अनेक विविध स्टाईलिश आऊटफिट परिधान केले. 2007 मध्ये झालेल्या ऑस्करच्या रेड कार्पेटवर निकोल किडमनने लाल रंगाचे गाऊन परिधान केले होते. माने जवळ असलेल्या ‘बो’मुळे गाऊन स्टाईलिश लूक मिळाले. निकोल किडमनने परिधान केलेले हिरव्या आणि काळ्या रंगाचे गाऊन सुद्धा ट्रेिंडगमध्ये होते.
 
रिस विथरस्पून
‘नोटबुक’ या प्रसिद्ध चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिस विथरस्पूनने सुद्धा ऑस्करच्या रेड कार्पेटवर हटके आऊटफिट परिधान केले होते. 2006 साली ‘वॉक द लाईन’ या चित्रपटासाठी रिस विथरस्पूनला सर्वोत्तम अभेनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ब्लॉन्ड रंगाचे गाऊन आणि त्यावर गुलाबी रंगाचे रिबन शोभून दिसत होते. या गाऊनवर रिसने हिर्‍याचे कानातले परिधान केले असून तिचे साधे आणि स्टाईलिश लूक रेड कार्पेटवर चर्चेचे विषय ठरले होते. या गाऊनवर न्यूड मेकअप आणि मेसी बन हेयरस्टाईल शोभून दिसत होते.
...