महिला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्राची परियोजना
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019

  • खा. रामदास तडस यांच्या प्रश्नाला केंद्रीय कृषि राज्यमंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे उत्तर
  • लोकसभेत उपस्थित केला प्रश्न संख्या ४५२० अंतर्गत अतारांकित प्रश्न
वर्धा, 
शेती हा अर्थव्यवस्थेचा पाया आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार शेतीलाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे, गत चार वर्षामध्ये महिला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकारद्वारा केलेल्या कार्याच्या अनुषंगाने वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून हा विषय सभागृहासमोर मांडला. 
 
खा. तडस यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय कृषि राज्यमंत्री गजेन्द्रसिंह शेखावत यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले कृषी सहकारिता व किसान कल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांना शेतीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याकरिता विभिन्न योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून, प्रमुख योजनेकरिता ३० टक्के निधी राखून ठेवण्यात आलेला आहे. तसेच, विविध योजनेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पशुधन विकास उपमिशन अंतर्गत उद्यमिता विकास आणि रोजगार सृजन चा समावेश आहे.
 
 
 
कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील आयोजित केले जात आहेत केवीके, डीएसी व एफडब्ल्यूच्या राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थांमार्फत महिला शेतकऱ्यांसाठी आणि देशभरात राज्य कृषी व्यवस्थापन व विस्तार प्रशिक्षण संस्था. हे सर्व सुधारित करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या क्षमतेची आणि क्षमतेची क्षमता निर्माण करण्याचे उद्दीष्ट आहे. ग्रामीण विकास विभाग, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या महिला शेतकऱ्यांकरिता कृषी मध्ये ग्रामीण स्त्रिया, जे कुटुंब उत्पन्न वाढवण्यास योगदान देऊ शकतात. तसेच शेतीवर आधारित आजीविका निर्माण आणि टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने आजीविका मिशन (एनआरएलएम) राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण उप-घटक म्हणून 'महिला किसान सशक्तीकरण योजना' (एमकेएसपी) योजना सुरु केल्याचे उत्तरातून स्पष्ट केले.
 
शेतकऱ्यांना व त्यांच्या परीवारातील सदस्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की, घरातील महिलेच्या खंबीर पाठीब्याशिवाय शेती करणे शक्य नाही, त्यामुळे महिलांनी शेतील हातभार लागावा म्हणून बचत गटाच्या माध्यमातून व गटशेतीमध्ये सहभागी होऊन शेतीपूरक व्यवसायांना चालना दिल्यास महिलांच्या मदतीने शेतकरी नक्कीच समृध्द होईल असे मत खा. तडस यांनी यावेळी व्यक्त केले.