छत्तीसगडमध्ये चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला . घटनास्थळावरुन शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
बीजापूर येथील जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण तळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरुन शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आले आहे.