लोकपाल नियुक्तीसाठी सरकारची जाहिरात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
लोकपालची नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारने अर्ज मागविले असून, त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकपाल कायदा अस्तित्वात येऊन पाच वर्षांचा काळ झाला असताना ही जाहिरात देण्यात आली आहे.
लोकपाल आणि सदस्यांसाठी ही जाहिरात आहे. आजीमाजी सरन्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टातील माजी न्यायमूर्ती लोकपालच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करू शकतात, तर भ्रष्टाचारविरोधी धोरण, प्रशासन, दक्षता, अर्थ, विमा आणि बँकिंग, कायदा व व्यवस्थापन क्षेत्रात २५ वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती सदस्य पदासाठी अर्ज करू शकणार आहे. पदासाठीची वयोमर्यादा ४५ आहे. अध्यक्ष व सदस्यपदाची मुदत पाच वर्षे किंवा ७० वर्षे वय अशी आहे. अध्यक्षांचे वेतन व भत्ते हे सरन्यायाधीशांइतके असतील, तर सदस्यांचे वेतन व भत्ते हे सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींइतके असतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ फेब्रुवारी आहे. गेल्या महिन्यांत लोकपाल निवडीसाठी आठ सदस्यांच्या समितीची बैठक झाली होती. या समितीच्या अध्यक्षा माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई आहेत.