जान्हवी कपूर या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
मुंबई:
राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'पिंक'चा तामिळ रिमेक बनवला जाणार असून जान्हवी कपूर या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आसल्याची चर्चा आहे. तामिळ दिग्दर्शक एच. विनोद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून 'पिंक'मधील अभिनेता अमिताभ बच्चन यांची भूमिका साऊथ सुपरस्टार अजित कुमार करणार आहेत.
 
 

 
'पिंक'च्या तामिळ रिमेकमध्ये तापसी पन्नूची भूमिका अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथ साकरणार आहे. जान्हवी कपूर या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असून तिच्यासाठी स्क्रिप्टमध्ये काही बदल केले जात असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. जान्हवीने मागील वर्षीच 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
'पिंक'च्या तामिळ रिमेकची निर्मिती बोनी कपूर करत असून अजित कुमार सोबत बोनी कपूर यांनी काम करावं ही श्रीदेवींची इच्छा या निमित्ताने पूर्ण होणार आहे. श्रीदेवी बॉलिवूड प्रमाणेच साऊथ मध्येही तेवढ्याच लोकप्रिय होत्या. त्यामुळे आता जान्हवी साऊथमध्ये काय कमाल दाखवते याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.