घरावर विमान कोसळले; चार नागरिकांचा मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
गेल्या रविवारी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सेस्ना ४१४ ए विमान घरावर कोसळले. विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. विमान घरावर कोसळल्यावर , घराला आग लागली. यामध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.  विमानाच्या पायलटचा सुद्धा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
 
 
 
 
 
 

 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरावर विमान कोसळले, त्या घरातील मालकाने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी घरात चार जण उपस्थित होते. कोसळलेल्या विमानाची निर्मिती 1981 मध्ये करण्यात आली होती. विमान क्रॅश झाले, तेव्हा रजिस्ट्रेशन पेंडिग होते. दुर्घटनेतील विमान हे दोन इंजिन असलेले होते.