मुस्लिम शिक्षकाचा वंदे मातरम म्हणण्यास नकार; स्थानिकांनी शाळेवर केला हल्लाबोल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
 
बिहारच्या कटिहार जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी एका प्राथमिक शाळेत ध्वजारोहणावेळी वंदे मातरम गाणे न गायल्याने मोठे वादंग झाले आहे. प्राथमिक विद्यालयाचा शिक्षक अफझल हुसैननं 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला.
 
 
 
 
 
 
 
 
 
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी त्या शिक्षकावर हल्लाबोल केला. त्या शिक्षकाची स्थानिकांनी धुलाई केली. शिक्षक अफझल हुसैन म्हणाला, मी वंदे मातरम गायले नाही. कारण ते आमच्या धर्माच्या विरोधात आहे. आम्ही अल्लाहची प्रार्थना करतो आणि वंदे मातरम म्हणणे म्हणजे भारताची वंदना, जी आमच्या धर्माच्या विरोधात आहे. संविधानातही हे गाणं अनिवार्य नाही. सोशल मीडियावर याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यासंदर्भात माझ्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. जर मला अशी कोणतीही सूचना मिळाली, तर त्याची चौकशी केली जाईल. परंतु आतापर्यंत अशी कोणतीही तक्रार मला प्राप्त झालेली नाही असे कटिहार जिल्हा शिक्षक अधिकारी दिनेश चंद्र देव यांनी सांगितले.