सोनू निगम रुग्णालयात दाखल; सी-फूड खाणे भोवले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
 
बॉलिवूड सिंगर सोनू निगम याला सी फूड खाल्याने गंभीर अ‍ॅलर्जी झाली आहे. सध्या तो रूग्णालयात उपचार घेत असून त्याचा एक डोळा सुजला आहे. सोनू निगम ला लगेच आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सोनूने स्वत: इन्स्टाग्रामवर आपले दोन फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. सी फूड खाल्ल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. रूग्णालयात पोहोचायला आणखी उशीर झाला असता तर गंभीर स्थिती ओढवली असती. माझ्या श्वसननलिकेला सूज आली असती आणि मी श्वास घेऊ शकलो नसतो, असे सोनूने म्हटले आहे. अ‍ॅलर्जीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे.