'मुंगडा' चे रिमिक्स पाहून उषा मंगेशकर भडकल्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
उषा मंगेशकर यांनी गायलेले 'मुंगडा' गाण्याचे रिमिक्स नुकतेच प्रदर्शित झाले. टोटल धमाल’ हा मल्टी स्टारर कॉमेडी ड्रामा चे हे गाणे असून येत्या २२ फेबु्रवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण त्याआधी या चित्रपटाचे हे गाणे वादात सापडले आहे. चित्रपटातील सोनाक्षी सिन्हावर चित्रीत ‘मुंगडा’ या रिमिक्स गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी ‘मुंगडा’ रिमेक व्हर्जन पाहून संतप्त प्रतिक्रिया दिले. आता उषा मंगेशकर यांनीही या रिमेक व्हर्जनवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी पूर्णपणे रिमिक्स व्हर्जनच्या विरोधात आहे. सुंदर भावभावना आणि अपार कष्टांनी आम्ही ही गाणी बनवलीत. रिमिक्सच्या नावाखाली त्याचा असा बट्टयाबोळ करणे योग्य नाही,’असे उषा मंगेशकर यांनी म्हटले आहे. 
 
 
 
 
 ">
 
 
 
१९७७ मध्ये आलेल्या ‘इंकार’ या चित्रपटातील ‘मुंगडा’ या गाण्याला संगीत देणारे राजेश रोशन यांनीही या रिमिक्स व्हर्जनवर आगपाखड केली आहे. नव्या गाण्यात नको नको ते प्रयोग केले गेले आहेत. हे गाणे ऐकल्यावर एकच वाटते, ते म्हणजे फिल्ममेकर आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसले आहेत, असे ते म्हणाले.
 
 
यापूर्वी अनेकदा लता मंगेशकर यांनीही जुन्या गाण्यांच्या रिमिक्स व्हर्जनवर नाराजी व्यक्त केली आहे. गाण्यांच्या रिमिक्सचा हा ट्रेंड पाहून मला प्रचंड वेदना होतात. रिमिक्सच्या नावाखाली जुन्या अजराअमर गाण्यांच्या चाली बदलण्यात कसली आली सर्जनशीलता? या गाण्यांच्या चाली आणि शब्द बदलण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिलेत? असा उद्विग्न सवाल अलीकडे लता मंगेशकरांनी केला होता.