शेतात गाळ टाकताना दोघे जिवंत गाडले गेलेजेसीबीच्या सहाय्याने मृतदेह काढले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
बीड
रात्री शेतात गाळ टाकण्याचे काम करणारे टिप्पर अंगावरून गेल्याने चुलता व पुतण्या जागीच ठार झाल्याची घटना केज तालुक्यातील भाटुंबा येथे घडली. रात्री 2 वाजता घडलेल्या घटनेत दोघेही मातीखाली गाडले गेले होते. त्यानां सकाळी जेसीबीच्या सह्याने बाहेर काढण्यात आले आहे.
 

 
 
भाटूंबा येथील शेतकरी सर्जेराव बबर धपाटे हे आपल्या शेतात तळ्यातील माती टाकत होते. माती टाकण्याचे काम रात्री सुरू होते. त्याच्या सोबत त्यांचा पुतण्या बंटी हरिदास धपाटे देखील होता. मातीचे टिप्पर भरून येई पर्यंत आपण झोपू म्हणून ते मातीच्या ढिगाऱ्याजवळ झोपले टिप्पर माती घेऊन आले ते यांना समजले नाही. टिप्परच्या ड्रायवरने माती पहिल्या ढिगाऱ्याजवळ टाकली मात्र ती टिप्पर भर माती दोघांच्या अंगावर पडली आणि त्यात हे दोघे दाबले गेले. त्यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शोध घेतला असता ते मातीखाली दाबले गेल्याचे लक्षात येताच जेसीबीच्या सह्याने दोघांना बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला होता. दोघांचे मृतदेह पंचनामा केल्यानंतर पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यूसूफवडगाव पोलीस ठाण्यात टिप्पर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे