जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी डेव्हिड मालपास यांचे नामांकन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
वॉल स्ट्रीटचे माजी अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड मालपास यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकित केले आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार मालपस हे सध्या अमेरिकन सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे अंडर सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत. डेव्हिड मालपस हे जागतिक बँकेचे मोठे टीकाकार राहिले आहेत.
 जे देश खूप गरीब आहेत, त्यांना आर्थिक मदतीची मोठी गरज आहे. अशा देशांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मालपास प्रयत्न करतील. मालपास हे अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले 
 
 
 
 
 
 
 
 
अशा धोरणांचा अवलंब केला जाईल, ज्यामुळे जागतिक बँक जगभर गरिबीविरोधात लढा देऊ शकेल आणि आर्थिक संधी वाढतील, असे मालपस यांनी सांगितले. मालपास यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास ते दक्षिण कोरियाचे जिम याँग किम यांचे स्थान घेतील. जिम यांनी नुकताच राजीनामा दिला होता. २०१६ मध्ये मालपस यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आर्थिक सल्लागाराचे काम केले होते.
 
दरम्यान, भारतीय वंशाच्या पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी याही जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. १९४९ पासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड अमेरिका करते.