वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बांधकारक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019

 

 
 
 
 
 
 
 
 पुणे 
 
 
राज्याच्या परिवहन विभागाने हेल्मेटसक्तीसाठी एक महत्वाचे निर्णय घेतले आहे. नवीन दुचाकीची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने दुचाकीसोबत खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या वितरकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

केंद्रीय मोटर वाहन अधिनियम, १९८९नुसार एक हेल्मेट वाहनचालकाला देणे बंधनकारक आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे. परिवहन विभागाने २०१६ मध्ये एक परिपत्रक काढले असून, यात 'नवीन दुचाकी घेणाऱ्या ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे,' असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे परिपत्रक राज्यातील सर्व वाहन वितरकांना लागू आहे. मात्र, या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी केली आहे.
 

कोणताही वाहन उत्पादक किंवा वितरक स्व-खर्चातून खरेदीदाराला हेल्मेट देणार नाहीत. हेल्मेटचा खर्च प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खरेदीदाराच्या खिशातूनच वसूल केला जाणार, यात शंका नाही.