व्हॉटसअ‍ॅप करणार महिन्याला २० लाख अकाउंट बंद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
व्हॉटसअ‍ॅपचा उपयोग करणाऱ्या देशांत भारत अग्रेसर आहे. देशात व्हॉटसअ‍ॅपचे २० कोटींहून अधिक यूजर्स आहेत. साहजिकच याचा दुरुपयोगही होत आहे. त्यावर अंकुश लावण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपकडून सतत प्रयत्न करण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून व्हॉटसअ‍ॅपने महिन्याला २० लाख अकाउंट बंद करणे सुरू केले आहे.
 
 
 
 
अकाउंट बंद करण्याचा रजिस्ट्रेशन हा यातील पहिला टप्पा आहे. या वेळी व्हॉटसअ‍ॅपकडून कोड एसएमएसद्वारे पाठविण्यात येतो. यूजर्सला हा नंबर टाकून पुढे जावे लागते. तुमच्या नंबरद्वारे काही गैरवापर केला गेला असेल किंवा दुर्व्यवहार केला गेला असेल तर, व्हॉटसअ‍ॅपकडून रजिस्ट्रेशनवर प्रतिबंध आणण्यात येतो.