राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
मेष : तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला मिळेल. हिरवे उडीद गायीला खावू घाला.
वृषभ : तुमच्या कामाची गती वाढेल आणि कौतुक होईल. लाल रंगाचे फुल मारोतीला वहा.
मिथुन :बोलण्यात घोळ होईल आणि त्याचा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. सत्पात्री दान करा.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रांत आज यश नक्की मिळेल. गणपती स्तोत्र पठण करा.
िंसह : आपल्या कामाशी काम ठेवा, इतरांच्या फंदात पडू नका. सायंकाळी चंद्रोदयाला चंद्र दर्शन घ्या.
कन्या : मनातल्या योजना आकारास येण्याचा आजचा दिवस आहे. तुळशीची सकाळी पूजा करा.
तूळ : नाक दाबले की तोंड उघडते, या म्हणीचा प्रत्यय येईल. शुभ्र रंग आज लाभाचा आहे. चांदीची वस्तू दान द्या.
वृश्चिक : कुठल्यातरी दिव्य पुरुषाची भेट होईल आणि मार्ग सापडेल. काळे उडीद पुरचुंडीत बांधून दारावर बांधा.
धनू : प्रवासाचे बेत आखाल, मात्र तयारी सावधतेने करा. गाव मारोतीचे दर्शन लाभदायी ठरेल.
मकर :
कुंभ : पाण्यापासून धोका आहे. विहिरीत िंकवा तळ्यात जलचरांना घास घाला.
मीन : आजचा दिवस संयमाचा आहे. मनात आले ते तत्काळ पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवू नका. रक्तचंदनाचा टिळा लावा.