खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
- आरोपींकडून ऍड विनायक काकडे व ऍड पंकज मसाळकर यांनी केली पैरवी
 
 
 
 
 
प्रतिनिधी / हिंगणघाट,
 
शहरातील संत तुकडोजी वॉर्ड येथे दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी तीन वाजल्यादरम्यान सपना प्रवीण राडे यांचा जळून मृत्यू झाला होता. हिंगणघाट पोलिसांनी तपास करून गुन्ह्यातील आरोपी मृतकचे पती प्रवीण प्रभाकर राडे, प्रभाकर राडे , आशा राडे, आरोपी प्रवीण चे मामा विनायक बोरकर अश्या या चौघांविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, हुंडाबळी व अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल केला होता, व चारही आरोपिंना अटक केली होती . यातील प्रवीण राडे वगळता अन्य तिघांची जामीन मजूर होत त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती .मात्र प्रवीण राडे मागील दोन वर्षांपासून तुरुंगात होता .
 
दरम्यान यातील मृत सपना यांचे वडील वामन रघाटाटे यांनी या केस मध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. शासनाने ही विनंती मान्य करून ऍड. तळवेकर यांची या केस मध्ये शासनाकडून पैरवी करण्यास नियुक्ती केली होती. विशेष सरकारी वकील यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश हिंगणघाट यांच्या न्यायालयात या प्रकरणात खुनाची कलम ३०२ लावण्यात यावी अशी मागणी अर्ज केला होता.
 
हा अर्ज मान्यकरीत न्यायालयाने चौघांविरुद्ध खुनाचा खटला चालविण्यात यावा असा आदेश पारित केला होता. यामुळे या खुनाच्या खटल्यात एकूण १५ साक्षदारांना तपासण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश हिंगणघाट एस. व्ही. खोंगल यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. यात दिनांक ७ फेब्रुवारी २०१९ रोजी यातील चारही आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींतर्फे ऍड. विनायक दे. काकडे व ऍड पंकज मसाळकर यांनी पैरवी केली . व या खुनाच्या खटल्यातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली