आता अण्णा हजारेंचे मौनव्रत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
राळेगणसिद्धी,
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी सात दिवस उपोषण केले. सरकारकडून उपोषण सोडताना लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकर्‍यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्याचे जाहीरपणे सांगण्यात आले. मात्र, अण्णा आता लिखित पत्रावर अडून बसले आहेत.
 
 
 
 
 
शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्यात, परंतु केंद्रीय कृषि कार्यालयाकडून अजूनही अधिकृत पत्रच मिळालेले नाही, असे सांगत केंद्र सरकारला पत्र लिहिणार असून दोन दिवसानंतर मौन आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही तर निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अण्णांनी दिला आहे.
 
 
 
 
यावेळी अण्णांनी 2013 च्या आंदोलनात कार्यरत असलेल्या तत्कालीन ‘टीम अण्णा’वर देखील टीका केली. 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या अण्णांच्या आंदोलनात अरिंवद केजरीवाल, किरण बेदी सहभागी होते. मात्र अण्णांच्या आंदोलनानंतर टीम अण्णामध्ये असलेल्या काही लोकांच्या मनात ‘मुख्यमंत्री’ तर काहींच्या डोक्यात ‘राज्यपाल’ शिरला, असे म्हणत अण्णांनी टोला लगावला.