ममता बॅनर्जीच्या आंदोलनात सहभागी अधिकार्‍यांवर होणार कारवाई - पदोन्नती रद्द होण्याची शक्यता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
नवी दिल्ली,
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय कारवाईविरोधात मागील रविवारी केलेल्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी पाच पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे. संबंधित अधिकार्‍यांना प्रदान केलेली सेवापदके काढून घेत सेवाज्येष्ठतेनुसार मिळणार्‍या पदोन्नतीही रद्द करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
 
 
 
मागील रविवारी सायंकाळच्या सुमारास सीबीआय पथक कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कें द्र सरकारविरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिस महासंचालक वीरेंद्र कुमार, आयुक्त राजीव कुमार यांच्यासह पोलिस उप संचालक सुरक्षा विनीत कुमार गोयल, उप संचालक कायदा आणि सुव्यवस्था अनुज शर्मा, पोलिस आयुक्त ज्ञानवंत िंसह, कोलकाताचे अतिरिक्त आयुक्त सुप्रतिम सरकार हे अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत बसलेले होते. त्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नजरेत आले आहेत.
 
 
 
 
 
दरम्यान, गृह मंत्रालयाने राजीव कुमार यांच्याविरोधात पहिली कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. यात त्यांना देण्यात आलेली सेवापदके काढून घेण्यात येणार आहेत. तसेच, सेवाज्येष्ठता यादीतून वगळण्यात येणार आहे.