आलिया भट्ट ने मागितली कंगना राणौतची माफी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवीन वाद निर्माण झाले आहे. आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंगना या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडवर एकापाठोपाठ एक तोफ डागतेय. अलीकडे आपल्या या चित्रपटाकडे बॉलिवूडने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तिने आमिर खान व आलिया भट्टला लक्ष्य केले होते. आलिया व आमिर त्यांच्या चित्रपटाच्या ट्रायलसाठी मला आवर्जुन फोन करुन बोलवतात. पण माझ्या चित्रपटाच्या ट्रायलकडे पाठ फिरवतात. हे सारे संधीसाधू लोक आहेत, असे कंगना म्हणाली होती.
कंगनाचा हा आरोप आलियाच्या तरी जिव्हारी लागलेला दिसतोय. कदाचित म्हणूनच कंगनाची माफी मागायलाही ती तयार आहे. अलीकडे मीडियाशी बोलताना आलिया यावर बोलली. कंगना माझ्यावर नाराज असेल तर मी व्यक्तिश: तिची माफी मागेल. कंगनाला मी आवडत नाही, असे मला अजिबात वाटत नाही. मी तिला नाराज केले, असेही मला वाटत नाही. पण असे असेलच तर मी तिची माफी मागेल, असे आलिया म्हणाली.
केवळ इतकेच नाही तर आलियाने कंगनाची तोंड भरून स्तूती केली. मी कंगनाची फॅन आहे. ती परखड आहे. तिने स्वबळावर स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. हे करायला हिंमत लागते. मी शूटींगमध्ये बिझी होते आणि म्हणून तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जावू शकले नाही. तिला नाराज करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, असेही ती म्हणाली.