पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. डहाणू, तलासरी या भागात भूकंपाचे धक्के बसले असून ३.३ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाची मालिका सुरू असून  सतत होणाऱ्या भूकंपामुळे तेथील स्थानिकांच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाच्या हादऱ्याने भयभीत होऊन काही रहिवाशांनी घरेदेखील सोडली असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यात डहाणू, तलासरीत सलग चार भूकंपाचे हादरे बसले होते. यात एका २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली.भूकंपग्रस्त नागरिकांना अशा परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.