गूगलवर आज कॉफीचा कप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
गुगलने जगप्रसिद्ध व्यक्तीच्या जन्मदिनानिमित्त खास डुडल सुरू केले आहे. कॉफीचा शोध लावणाऱ्या फ्रीडली फर्नेन रंज यांची आज २२५ वी जयंती आहे. त्यांच्या सन्मानासाठी गुगलने खास डुडल तयार केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने कॉफीच्या रंगाचा डुडल तयार करून त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे.
 
 
 
 
जर्मनीत ८ फेब्रुवारी १७९४ रोजी जन्मलेल्या फ्रीडली फर्नेन रंज यांनी १८१९ साली कॉफीचा शोध लावला आहे. जर्मन भाषेत याला Kaffee म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर त्याची कॉफी म्हणून जगभरात ओळख झाली. केमिकल इतिहासात मोठे नाव असूनही १८५२ मध्ये एका केमिकल कंपनीच्या मॅनेजरने रंज यांना कामावरून काढून टाकण्यात आले. फर्नेन रंज यांची अखेरपर्यंत आर्थिक परिस्थिती नाजूक राहिली. त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीबीत काढावे लागले. २५ मार्च १८६७ मध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
 
 
 
 
 
गुगलने त्यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांच्या जयंतीनिमित्त खास डुडल तयार केले आहे. फ्रीडलीब फर्नेन रंज हे गुगलने तयार केलेल्या कॉफीच्या रंगातील खास डुडलमध्ये दिसत आहेत. फ्रेडलिब यांनी स्वतः कॉफीचा कप हातात पकडला असून ते कॉफी पिताना डुडलमध्ये दिसत आहेत. त्यांच्या बाजुला एक मांजरही यात बसलेली दिसत आहे.