महिला सक्षमीकरणसंबंधी ट्रम्प प्रशासनाचे ऐतिहासिक पाऊल-पाच कोटी महिलांच्या विकासासाठी दोन महायोजना-भारतात खाजगी क्षेत्राच्या सहकार्य घेणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
वॉशिंग्टन,
ट्रम्प प्रशासनाने महिला सक्षमीकरणसंबंधी भारतात खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने भागीदारीतून दोन महायोजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाच कोटी महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुत्री तसेच वरिष्ठ सल्लागार इवान्का ट्रम्प करणार आहे.
 
 
 
 
 
ट्रम्प यांनी महिलांच्या जागतिक विकास आणि समृद्धी (डब्ल्यू-जीडीपी) ला प्रोत्साहन देण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली असून, या संबंधी एक कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
 
व्हाईट हाऊस सूत्रांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये पेप्सिको कंपनीसोबत युनाइटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआईडी) भागीदारीत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य करेल. ओपीआयसी (द ओव्हरसीज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन) द्वारे भारतीय महिलांना 10 कोटी डॉलर्सच्या कर्जाचा पुरवठा केला जाईल. उद्योगक्षेत्रातील महिलांच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यूएसएड-यूपीएस यंत्रणा विशेष भूमिका पार पाडणार आहे.
 
 
या संदर्भात आफ्रिका, आशिया आणि मध्य अमेरिका क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष कें द्रित केले जाईल.
 
 
 
वुई राईज...
परराष्ट्र मंत्रालयाचा जागतिक महिला विषयासंबंधीचे कार्यालय सूक्ष्म वित्तपुरवठ्याबाबत सामाजिक संघटनासोबत वुई राईज (आमचा उदय)कार्यक्रम सुरू करणार आहे. याद्वारे उद्योगक्षेत्रातील महिलांसमोर उभ्या राहणार्‍या अडचणी दूर केल्या जातील. सुरुवातीला पाच कोटी डॉलर्सच्या तरतुदीतून महिलांच्या सक्षमीकरणास प्रोत्साहन दिले जाईल. यातून पाच कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असल्याचे व्हाईट हाऊस सूत्रांनी नमूद केले.