विद्यार्थ्यांनी केली मानवरहित युएवी विमानाची निर्मिती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आयआयटी कानपूरच्या एअरो स्पेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी मानवरहित यूएवी विमानाची निर्मिती केली आहे. ड्रोन प्रमाणेच हे यूएवी कार्य करेल. या यूएवीची निर्मिती एअरो स्पेस सायन्स इंजिनिअरिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिषेक व मंगल कोठारी यांचे मोठे यश आहे. या दोन प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली निधीशराज, रामकृष्ण व अनिमेष शास्त्री या विद्यार्थ्यांनी हे यूएवी बनवले आहे.
 
 
 
या यूएवीमध्ये ५ हजार एम्यियरची पावर बॅट्री आहे. निश्चित केलेल्या हद्दीमध्ये दीड तासापर्यंत उड्डाण करण्याची यूएवीची क्षमता आहे. अडीच किलो वजनाचे हे यूएवी एक किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम आहे. जिथे वाहने पोहोचू शकत नाही अशा भागात औषधे आणि अन्य वस्तू पोहोचवण्यासाठी या ड्रोनचा उपयोग करता येऊ शकतो. 
 
 
 
 
आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या यूएवीची बंगळुरुमध्ये होणाऱ्या देशातील सर्वात मोठया एअर शो मध्ये प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.आता विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरु येलहंका येथे होणाऱ्या एअर शो वर केंद्रीत केले आहे.
 
 
याएअर शो साठी देशाच्या ५० कॉलेजेसमधील १२५ एअरो डिझाइनसमध्ये स्पर्धा होती. त्यात १७ डिझाईनसची निवड झाली. त्यानंतर अखेरीस सहा डिझाइन आणि प्रोटोटाइपची निवड झाली.