4 हजार जागांसाठी 8 लाख अर्ज; राज्य सरकारच्या मेगाभरतीला सुरुवात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
राज्यातील मेगाभरतीत चार हजार पदांसाठी सुमारे साडे सात लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 
 
 
सरकार 72 हजार जागांसाठी पदभरती दोन टप्प्यात करणार असल्याचे मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात विविध आस्थापनांच्या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. ‘वर्ग क आणि ड’ च्या सरकारी नोकर्‍यांसाठी तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत निघालेल्या एकूण 4410 पदांसाठी सुमारे 7.88 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.
 
 
विभागनिहाय जागांचा विचार केला असता, सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या 405 जागांसाठी 58 हजार अर्ज, कृषी विभागातील कृषी सेवक पदाच्या 1416 जागांसाठी 82,307 अर्ज, वित्त विभागातील लेखापाल, कारकून, कनिष्ठ लेखापरीक्षक आणि कनिष्ठ लेखापालच्या 959 जागांसाठी 1.74 लाख अर्ज, वन विभागातील वन रक्षकाच्या 1218 पदांसाठी 4.3 लाख अर्ज, वन सर्वेक्षकाच्या 51 पदांसाठी 1,233 अर्ज, मत्स्य विभागातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदाच्या 79 जागांसाठी 591 अर्ज आणि जल संधारण विभागातील सहायक माती व जल संरक्षण अधिकार्‍यांच्या 282 पदांसाठी 42,078 अर्ज प्राप्त झाले आहेत.