मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पुणे :
 
 
मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली़ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा तापमानात घट झाली असून सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़.११ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९़.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़.
पुढील आठवड्यात विदर्भात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत घटलेले राहणार आहे़. उत्तर भारतात अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे़.
 
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे़.