मॅडम तुसाँमध्ये प्रियांकाच्या चार पुतळ्यांना स्थान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बॉलिवूडची 'देसी गर्ल'प्रियांका चोप्रा केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील प्रसारमाध्यमांतही चर्चेत असते. जगभरातील तब्बल चार मादाम तुसाँ संग्रहालयात प्रियांकाच्या पुतळ्यांना स्थान मिळाले असून तिने एक नवा इतिहास रचला आहे. 
 
 
 
न्यूयॉर्कमधील मादाम तुसाँ संग्रहालयात प्रियांकाच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले असून ते खूप व्हायरल होत आहेत. याशिवाय मादाम तुसाँच्या ऑफिशिअल पेजवरही प्रियांकाच्या स्टॅचू मेकिंगचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा स्टॅचू तिच्या रेड कार्पेट लूकवर बनविण्यात आले आहे. न्यूयॉर्क व्यतिरिक्त लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्येही प्रियांकाचा पुतळा बनविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे  जगातील एकूण चार मादाम तुसाँ म्यूझियममध्ये स्थान मिळवणारी पहिली महिला सेलिब्रिटी बनण्याची किमया प्रियांकाने  साधली आहे. न्यूयॉर्क आणि लंडन व्यतिरिक्त सिडनी आणि आशियातील मादाम तुसाँ म्युझियममध्ये प्रियांकाचे मेणाचे पुतळे उभे राहणार आहेत.
 
 
लवकरच प्रियांका 'इजंट इट रोमँटिक' आणि 'अ किड लाइक जॅक' या दोन हॉलिवूड चित्रपटांत दिसणार आहे. याशिवाय 'द स्काय इज पिंक' या हिंदी चित्रपटाचंही शूटिंग सुरू आहे. यात प्रियांकाबरोबरच फरहान अख्तर आणि झायरा वसीम यांच्याही भूमिका आहेत.