जन्मभूमीतच रामाचे भव्य मंदिर होणार - योगी आदित्यनाथ यांचा विश्वास
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
पूर्णिया,
भगवान श्रीरामाचा अयोध्येत जिथे जन्म झाला होता, त्याच जन्मभूमीत त्यांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे, असा विश्वास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज शुक्रवारी येथे व्यक्त केला.
 
 

 
 
 
उत्तरप्रदेशात आगामी काळात खूप काही होणार आहे, िंचता नको, श्रीरामाचे मंदिरही त्याच ठिकाणी होईल, यात कोणतीच शंका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
 
 
 
भगवान रामाच्या जन्मस्थानी येणारे भाविक आता अयोध्येत येतात, फैजाबाद जिल्ह्यात जात नाहीत आणि कुंभमेळ्यासाठी भाविक प्रयागराजला येतात, अलाहाबादला नाही. आगामी काळात खूप काही होणार आहे, असे ते म्हणाले.
 
 
 
बिहारमध्ये नितीशकुमार आणि सुशील मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या कामगिरीमुळे सामान्य लोकांची बिहारबाबतची धारणा आता बदलली आहे. आम्ही विरोधकांसारखी देश तोडण्याची भाषा करीत नाही, असे सांगताना योगी यांनी, बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन, तेथील परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले.