निर्देशांकात 424 अंकांची घसरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
मुंबई,
 
जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचे नकारात्मक तिमाही निकाल या पृष्ठभूमीवर आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये 424.61 अंकांची घसरण होऊन 36,546.48 वर बंद झाला तर, राष्ट्रीय शेअर बाजार 125.80 अंकांनी घसरून 10,943.60 वर स्थिरावला.
 
 

 
 
 
अमेरिका आणि चीन व्यापारयुद्धावर तोडगा निघण्यासाठी 1 मार्च या ठरविलेल्या ‘डेडलाईन’ पूर्वी चीनच्या अध्यक्षांना भेटणार नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकंदरीतच याचे परिणाम लक्षात घेऊन जागतिक गुंतवणूकदारांमध्ये निरुत्साह पसरला आहे. परिणामी जागतिक पातळीवरील सर्वच शेअर बाजार निर्देशांक घसरले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजार निर्देशांकावर देखील दिसून आला. त्यामुळे धातू क्षेत्रातील वेदांता, टाटा स्टील सारख्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले.
 
 
 
 
 
 
त्यातच भारतीय वाहन उद्योग कंपन्यांना या तिमाहीत होत असलेला तोटा देखील भारतीय गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम साधून गेला. टाटा मोटोर्सला तब्बल 27 हजार कोटींचा तोटा झाल्याने कंपनीचा शेअर तब्बल 30 टक्क्यांनी घसरला होता. त्याचबरोबर मिंहद्राला डिसेंबर तिमाहीत अपेक्षित नफा ना झाल्याने कंपनीचा शेअर 2.64 टक्क्यांनी घसरला होता.