३ राज्यांत विषारी दारूचे २८ बळी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
देशात तीन राज्यांमध्ये परत एकदा विषारी दारूचे बळी गेले आहे. बिहार, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू पिल्याने एकूण २८ लोकांचा मृत्यू झाला आहे. युपी सरकारने चौकशीचे आदेश दिले असून बिहार आणि उत्तराखंड मध्ये कारवाई चालू आहे. युपीच्या सहरांपुर जिल्यातील देवबंद गावामध्ये विषारी दारू पिल्याने ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. १० जण गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा दवाखान्यात उपचार सुरु आहे. 
 
कुशीनगर मध्ये गेले ९ बळी 
 
 
 
 

 
 
 
उत्तरप्रदेशच्या कुशीनगर मध्ये दोन दिवसाआधी विषारी दारूने ९ लोकांचे जीव घेतले . या घटनेच्या चौकशीचे आदेश योगी सरकारने दिले आहे. तसेच एक आबकरी अधिकारी आणि चार पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील अधिकारी सतर्क झाले आहे. 
 
 
रुडकीमध्ये ७ लोकांचा मृत्यू 
 
 
 
 
 
 
 
 
 
याचप्रकारे उत्तराखंडच्या रुडकी मध्ये विषारी दारूने ७ लोकांचे जीव घेतले. मात्र, एएनआय एजन्सीनुसार मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या १२ सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे राज्यभर शोक व्यक्त केले जात आहे. चौकशीनंतर १३ अधिकारी आणि कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच झबरेडा पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रदीप मिश्रासह ४ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.