इसिसचा आठवड्याभरात 100 टक्के नायनाट : डोनाल्ड ट्रम्प
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
वॉिंशग्टन, 
 
 
 
सध्या दहशतवादी संघटना इसिसच्या ताब्यात असलेला भूभाग अत्यंत कमी असून इसिसचा आठवड्याभरात 100 टक्के नायनाट करण्यात येईल, असा ठाम दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
 
 
इसिसने इराक आणि सीरिया येथील मोठा भूभाग ताब्यात घेत आपले तळ ठोकले होते. आता इसिसकडे केवळ एक टक्का भूभाग शिल्लक राहिला असून, लष्करी फौजांनी गेल्या वर्षभरात त्याच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पुढील आठवड्याभरात ही दहशतवादी संघटना 100 टक्के इतिहासजमा होईल. इसिसविरोधात आता नव्याने धोरण आखण्यात आले आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांना आणि दलाच्या प्रमुखांना बळ देणे व इतर भागीदारांना सक्षम करणे तसेच दहशतवाद्यांच्या विचारसरणीवर थेट हल्ला चढवणे अशी ही रणनीती असणार आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत केलेल्या संयुक्त मोहिमेत सीरिया आणि इराकमधील बहुतांश भूभाग इसिसच्या ताब्यातून सोडवण्यात आला आहे. आता अफगाणिस्तान, लिबिया, पश्चिम आफि‘का अशा काही ठिकाणी या संघटनेचे थोडे अस्तित्व शि‘क आहे. त्या ठिकाणांहून आठवड्याच्या आत इसिसचा समूळ नायनाट करण्यात येईल, असेही ट्रम्प म्हणाले.