जम्मू-कश्मीरमध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन; १० जण बर्फाखाली अडकले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कुलगाम :
 
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी बर्फवृष्टी सुरु आहे. कुलगाम जिल्ह्यातील जवाहर टनेल भागामध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन झाल्याने दहा पोलिस अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
 
 
 
 
रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली असून काश्मीरमध्ये पोलिसांनी आणि यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
हिमाचल प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरु झाला असून सर्वत्र बर्फाचे ढिगारे साचले आहेत. पुढील काही दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.