आकाश अंबानीचा लग्नमुहूर्त जाहीर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
मुंबई,
 

 
 
 
देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहतासोबत 9 मार्च रोजी आकाश विवाहबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता. पुढील महिन्यात आकाशचा शाही विवाह पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून लग्नाची जोरात तयारी सुरू आहे. नुकतेच मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा विवाह पार पडला होता. त्यावेळी देशाभरातील दिग्गजांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती. येत्या 9 मार्चला शनिवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सायंकाळी 7.30 वाजता हा विवाहसोहळा पार पडणार आहे, तर 11 मार्चला याच ठिकाणी स्वागत समारंभ पार पडेल.