आज आयपीसीसीचे निकाल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
दिल्ली:
 
 
सीए परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या आयपीसीसी परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. हे निकाल आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून आयसीएआयच्या ऑफीशियल वेबसाइटसोबतच इतर वेबसाइट्सवरही निकाल पाहता येणार आहे.
मागच्या वर्षी आयपीसीसीची परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली असून या परीक्षेचे निकाल आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर होऊ शकतात. हे निकाल खालीलप्रमाणे पाहता येतील
- किंवा  या संकेतस्थळांवर सीएचे निकाल पाहता येतील
-निकालाची लिंक अॅक्टीव्हॅट झाली की ती पाहता येईल.
-लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पान उघडेल
-या पानावर तुमचा रोल नंबर/पीन नंबर/ रजिस्ट्रेशन नंबर दाखल करा
-त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल