पुणे,
2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही राज्यातील 48 पैकी 42 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी यात एका जागेची भर पडणार आहे. अर्थात् आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत 43 जागा जिंकणार असून, ही 43 वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केला.
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मागील निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी बारामतीची जागा आमच्या हातातून गेली होती, मात्र या निवडणुकीत बारामतीत भाजपाच विजयी होणार आहे. इतकेच नव्हे, तर शिरूर आणि मावळमधील जागाही भाजपाच िंजकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.