प्रतिष्ठेसाठी झुंजणार भारतीय महिलांचा संघ
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
हॅमिल्टन,
भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका गमावली असली तरी त्या आता रविवारी तिसर्‍या व अंतिम टी-20 सामन्यात प्रतिष्ठा वाचविण्यासाठी प्रोत्साहनकारक विजय नोंदविण्यास उत्सुक आहे.
 
 
एकदिवसीय मालिका 2-1 ने िंजकल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली आहे. या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 असी विजयी आघाडी प्राप्त केलेली आहे. 2020 विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी संघबांधणीच्या दृष्टीने संघव्यवस्थापनाने वरिष्ठ फलंदाज मिताली राजला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
आम्ही संघबांधणीच्या प्रक्रियेत आहो. सध्या आमची स्थिती कठीण आहे, परंतु भविष्यात आमच्या युवा खेळाडूंना अनुभवाचा लाभ होईल व ते उत्कृष्ट प्रदर्शन करतील, असे हरमनप्रीत कौर म्हणाली.