पॅरालिम्पिक कमिटीनेउठविली रशियावरील बंदी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
मॉस्को :
 
रशियाच्या पॅरालिम्पिक कमिटीने 70 पैकी 69 पुनवर्सन निकषांची पूर्तता केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटीने (आयपीसी) महत्त्वपूर्ण सुधारणा केल्याबद्दल रशिया कमिटीची प्रशंसा केली व रशियावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. आता रशिया पॅरालिम्पिक समिती पुढील महिन्यात आयपीसीशी जुळणार आहे. रशियातील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या प्रतिसादाअभावी एका निकषाची पूर्तता होऊ शकली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्च रोजी होईल, असे आयपीसीचे अध्यक्ष अॅण्ड्रयू पर्सन्स यांनी सांगितले. रशियाच्या प्रायोजित डोिंपग प्रोग्राममध्ये एक हजारपेक्षा अधिक रशियन अॅथ्लिट्‌सचा सहभाग होता.