अमेरिकेतही पसरले लष्कर-ए-तोयबाचे जाळे; अतिरेकी बनण्यासाठी पाकला जाणार्‍या तरुणाला अटक;एफबीआयची विमानतळावर कारवाई
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
वॉिंशग्टन, 
 
 
 
लष्कर-ए-तोयबा या जहाल दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी पाकिस्तानला जाणार्‍या न्यू यॉर्क येथील एका तरुणाला एफबीआयने विमानतळावर अटक केली.26/11 च्या मुंबई हल्ल्याचा कट रचणार्‍या तोयबाने अमेरिकेतही आपले जाळे पसरविले असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
 
हा तरुण पाकिस्तानला जाणार्‍या विमानात बसण्याच्या तयारीत होता. जेसस विल्फ‘ेडो असे त्याचे नाव असून, जॉन केनेडी विमानतळावर गुरुवारी रात्री त्याला बेड्या ठोकण्यात आल्या, अशी माहिती एफबीआयच्या अधिकार्‍याने दिली.
धक्कादायक म्हणजे, अमेरिकेत तोयबाचा प्रभाव वाढत असल्याची आणखी एक घटना उजेडात आली आहे. टेक्सास येथील एका अल्पवयीन मुलाला, सोशल मीडियावरून अमेरिकन तरुणांना तोयबाकडे आकर्षित करण्यात, तसेच त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानला पाठविण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
तोयबात सामील होण्यासाठी जेससने ऑनलाईन प्रयत्न केले होते. त्याला यात त्या अल्पवयीन मुलाने मदत केली होती. मला लोकांना ठार मारायचे आहे, मोठा नरसंहार करायचा आहे, असे त्याने त्याच्या ऑनलाईन अंडरकव्हर एजंटला सांगितले होते, असे अधिकार्‍याने सांगितले.
 
मला यापुढे अतिरेक्यांचे आयुष्य जगायचचे आहे, दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात जायचे आहे आणि त्यासाठी मी खुप आतूर आहो, असेही त्याने ऑनलाईन नमूद केले होते. त्याचा ई-मेल एफबीआयने ट्रॅप केल्यानंतर त्याच्या प्रत्येक हालचालीवर अधिकारी नजर ठेवून होते. अखेर विमानतळावर त्याला अटक करण्यात आली.