अमेरिकेतील ‘ग्रीन कार्ड’साठीची मर्यादा होणार रद्द
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
 
वॉिंशग्टन, 
 
 
 
ग्रीन कार्डबाबत प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा संपुष्टात आणण्याबाबतची विधेयके अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी आणि सिनेटमध्ये मांडण्यात आली आहेत. या विधेयकांचे कायद्यामध्ये रूपांतर झाल्यास अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी कायदेशीर वास्तव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार आहे.
 
 
सिनेटमध्ये रिपब्लिकन नेते माइक ली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्या कमला हॅरिस यांनी फेअरनेस फॉर हाय-स्किल्ड इमिग्रण्ट्स अॅक्ट (एचआर ) विधेयक बुधवारी मांडले. त्यामुळे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा दूर होणार आहे.
 
 
लोकप्रतिनिधी सभागृहात कॉंग्रेस नेते झो लॉफग्रेन आणि केन बक यांनी मांडले. हे विधेयक कॉंग्रेसने मंजूर केल्यास आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास एचबी व्हिसा असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना लाभ होणार आहे.