पोलिस चौकीवर हिमस्खलन; पाच पोलिसांसह ७ जणांचे मृतदेह सापडले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
श्रीनगर : 
 
काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवाहर टनेल भागामध्ये पोलीस चौकीवर हिमस्खलन होऊन दहा पोलीस अडकले होते. दरम्यान, आज बर्फाखाली अडकलेल्यांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले असून मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. मात्र एक पोलीस कर्मचारी अद्याप बेपत्ता आहे. तर दोन पोलिसांना बर्फाखालून सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.