ब्रिटिश नागरिकत्वाची झाली निश्चिती; 'विंडरश' योजनेचा झाला अनेकांना फायदा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वृत्तसंस्था, लंडन
ब्रिटनमधील मे सरकारने सादर केलेल्या विंडरश योजनेचा फायदा अनेकांना झाला.  ४५० पेक्षा अधिक भारतीयांचे ब्रिटिश नागरिकत्व निश्चित झाले असून पूर्वीच्या काळी ब्रिटिशांचा वसाहती असलेल्या देशातील जे नागरिक सन १९७३ पूर्वी ब्रिटनमध्ये दाखल झाले त्यांच्याशी संबंधित ही योजना आहे. हे नागरिक ब्रिटनमध्ये वर्षानुवर्षे राहात असले तरी त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळालेले नव्हते. त्यामुळे ब्रिटनच्या नागरिकांना मिळणाऱ्या अनेक अधिकारांपासून हे नागरिक वंचित राहात होते. मात्र विंडरश योजनेमुळे विविध देशांच्या या नागरिकांना ब्रिटिश नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल. यामुळे सगळे अधिकार प्राप्त करण्याचा मार्ग त्यांच्यासाठी प्रशस्त होईल. नागरिकत्वाबाबतचा एक घोटाळा उघड झाल्यानंतर, नागरिकांच्या समस्या लक्षात घेत ब्रिटनच्या गृहखात्याने गेल्या वर्षी विंडरश समिती स्थापन केली होती.