सूर नदी पात्रातील मृतदेहाचे गूढ उकलले- पत्नीने कट रचून केली पत्नीची हत्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
भंडारा,
सूर नदीच्या पात्रात गाडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात भंडारा पोलिसांना यश आले असून नरेश लांजेवार याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हे हत्याकांड नरेश याची पत्नी पुष्पा व सहकाèयांच्या मदतीने घडवून आणण्यात आल्याचेही जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
मागील महिनाभèयात जिल्हयात6 हत्येचे गुन्हे घडले. या सर्व प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात भंडारा पोलिसांनी चपळाई दाखविली. सर्व प्रकरणाती गुन्हेगार 24 तासाच्या आत गजाआड केले गेले. सर्व प्रकरणांचा तपास स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात आला होता. 6 फेब्रुवारी रोजी नेरी येथील सूूर नदीपात्रात नरेश लांजेवार या इसमाचा मृतदेह रेतीत गाडलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्या स्थितीत मृतदेह आढळून आला, त्यावरुन ती हत्या असल्याचा अंदाज पोलिसांना होता. अखेर तो अंदाज खरा ठरीत नरेशच्या हत्येमागील गूढ उकलले आहे. या संदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने आज जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मोहाडी येथील नेहरु वार्डात रहात असलेला नरेश लांजेवार हा 16 जानेवारी 2019 रोजी घरुन बेपत्ता झाल्याची तक्रारी नरेशची पत्नी पुष्पा हिने 28 जानेवारी रोजी मोहाडी पोलिस ठाण्याला दिली. 6 रोजी सूर नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आल्यानंतर मृत व्यक्ती नरेश लांजेवार असल्याचे स्पष्ट झाले. संशय असल्याने त्या दृष्टीने तपास करण्यात आला. नरेशच्या पत्नीचे रोहना येथील अनिल आगाशे याच्या सोबत विवाहबाह्य संबंध होते. याची चाहूल लागल्याने नरेश हा दारु पिऊन पत्नीशी वाद घालीत असे. त्यामुळे पत्नी पुष्पा हिने अनील आगाशे याच्या मदतीने नरेशच्या हत्येचा कट रचला. यासाठी नेरी येथील कंठीराम हजारे व कन्हान येथील नंदकिशोर मंडपे यांना सोबत घेण्यात आले. मंडपे याला हत्येसाठी 10 हजाराची सुपारी देण्यात आली होती, असेही पोलिसांनी सांगितले.
 
 
 
16 जानेवारी रोजी नरेश लांजेवार वरठी येथे आला होता. त्याला हजारे आणि मंडपे यांनी सोबत घेतले व सूर नदीच्या पात्रात दारु पिण्यासाठी घेऊन गेले. त्यापूर्वी दारुच्या बाटतील झोपेच्या गोळ्या टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे दारु पिताच नरेश बेशुद्ध झाला. त्यानंतर दोघांनी मिळून नरेशच्या डोक्यावर लाकडाने वार करुन त्याचा जीव घेतला व नदी पात्रात पुरले. या प्रकरणातील पत्नीसह इतर तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक रवींद्र मानकर, उपनिरिक्षक सचिन गदादे व सहकाèयांनी हे प्रकरण उघड केल्याबद्ल त्यांचे अभिनंदनही पोलिस अधीक्षकांनी केले. पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुधाकर चव्हाण उपस्थित होते.