माजी आमदार दीपक आत्राम यांच्यावर अखेर गुन्हा दाखल -संतोष आत्राम - 2014 मधील संतोष आत्राम मारहाण प्रकरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
गडचिरोली,
अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह आलापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके,सुधाकर कोरेत व संतोष पोल्लालवार यांच्यावर चार वर्षांपूर्वी तत्कालीन युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष आत्राम यांना केलेल्या मारहाण प्रकरणात काल रात्री अहेरी पोलीस स्टेशन येथे भांदवि ३२६,५०४,३४ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
याबाबत संतोष आत्राम यांनी अहेरी येथे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देताना म्हणाले की माझे बंधू यांनी दिनांक २६ जून २०१४ रोजी रात्री ११.३० वाजता हे माजी आमदार दीपक आत्राम स्वतः त्यांचे भाचे व आलापल्ली चे माजी सरपंच विजय कुसनाके,घरचा नौकर सुधाकर कोरेत व ड्रॅयव्हर संतोष पोलालवार हे माझ्या राहत्या घरी प्रवेश करून मला लाथा बुक्क्याने मला मारहाण केली तसेच लाईट बंद करून क्रिकेट स्टम्प ने मारहाण केली.यावेळी मी अहेरी पोलीस स्टेशन ला कॉल केला हे मारहाण करणाऱ्या चौघ्यांना माहीत होताच त्यांनी मला मारहाण करणे थांबविले.त्यावेळी दीपक आत्राम हे तत्कालीन आमदार होते त्याकरणाने पोलीस अंगरक्षक अकबर शेख,नाकतोडे,गणवीर हे त्याठिकाणी धावून आले व त्यांनी लाईट चालू करून आणि विजय कुसनाके यांच्या हातातील स्टंप काढून घेतला.प्रथम मी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयात दाखल केले.
 
 
आठ दिवसांनी मी अहेरी पोलीस स्टेशन ला याबाबत तक्रार अर्ज दिला त्यवेळी एनसी गुन्हा नोंदविण्यात आला होता मात्र माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध व तत्कालीन आमदार दीपक आत्राम यांच्या मुजोरीबद्दल मी वेळोवेळी न्याय मागत होतो व माझी चौकशी चालू होती.माझ्या प्रयत्नाने व चौकशी अंती सत्य बाहेर येऊन दीपक आत्राम यांच्या सह चौघ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
विशेष म्हणजे त्यावेळी दीपक आत्राम सह चौघ्यांनी केलेल्या मारहाणनित छातीच्या डाव्या बाजूस बरगळीमध्ये कायम ची दुखापत झाली आणि डोक्याला बधिरत्व सुद्धा आले आहे.तसेच प्रकरण घटतांना दीपक आत्राम हे तत्कालीन आमदार होते त्यावेळी राज्यात काँग्रेस चे सरकार होते व मी काँग्रेसचा विधानसभा स्तराचा पदाधिकारी होतो मात्र तेव्हा मला न्याय नव्हता मात्र उशिरा का होईना चार वर्षाने माझे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या माजी आमदार दीपक आत्राम,विजय कुसनाके, सुधाकर कोरेत व संतोष पोल्लालवार यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे मला न्याय मिळण्याच्या विश्वास आहे.चौघाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला असल्याने चौघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक करून चौकशी करून मला न्याय द्यावा अशी मागणी संतोष आत्राम यांनी पत्रकार परिषेदेत केली.